Hingoli Farmer Cast Issue | तूर खरेदीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जात विचारली!
तूर आणि हरभरा खरेदीसाठी सुरु असलेल्या ऑनलाईन नोंदणीवेळी चक्क शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असून शेतकर्यातून संताप व्यक्त केला जात आहे. जातीचा उल्लेख असलेला कारखाना रद्द करण्याची मागणी शेतकर्यांतून केली जाते आहे