नातवांचा नादखुळा! 88व्या अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर

Continues below advertisement

संगमनेर : 88व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत दोन्ही नातवांनी आपल्या आजी-आजोबा यांना अनोखी सफर घडवली आहे. पुणे ते चिंचोली या त्यांच्या मूळ गावी चक्क हेलिकॉप्टरमधून आणून जंगी सोहळा पार पाडला आहे. यापूर्वी वधुसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, आजी-आजोबांसाठी हेलिकॉप्टर सफर घडवल्याची ही कदिचित पहिलीच घटना असेल.

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव गावचे गोडगे कुटुंबीय. या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेले देवराम व चहाबाई हे दाम्पत्य. त्यांचा 88वा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे नातू अविनाश व नंदकुमार यांनी अविसमरणीय करण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांना थेट पुण्याहून हेलिकॉप्टरमधून गावी आणत वाजत गाजत मिरवणूक काढून सोहळा पार पाडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram