Parbhani Heavy Rain Damage | परभणीत मुसळधार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांचे डोळे सरकारी मदतीकडे

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यात जून ते 22 सप्टेंबर पर्यंत एकूण 744 मिमी पाऊस झालाय ज्याची टक्केवारी ही 101% एवढी आहे त्यामुळे जिल्ह्यातील येलदरी, लोअर दुधना, करपरा, मासोळी आदी प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत सर्व नद्या ही ओसंडून वाहत आहे शिवाय मागच्या 15 दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. ज्याने काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटलेत, कापसाचे भरलेले बोंड सडून गेलेत शिवाय उडीद, मूग, तुरीसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यात पुर्णा, गंगाखेड, जिंतुर, सेलु या तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. या चारही तालुक्यात मिळून जवळपास 40 हजार हेक्टर नुकसान झाले आहे.शिवाय मागच्या दोन दिवसात तीन हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram