Wardha Flood | वरुण राजाची कृपा वर्ध्यासाठी प्रकोप ठरली, घरं, हजारो शेतजमीन पुराच्या पाण्यात | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु आहे. पाचही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement