Sindhudurg Land Slide | सिंधुदुर्गातील भूस्खलनामुळे चेंदवण-वेलवाडी मार्ग बंद, पावसामुळे डोंगर खचला
तळकोकणात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात डोंगरात भुसखनन होऊन डोंगरात झाडे कोसळून पडली, तर डोंगराची माती लोकवस्तीपर्यत आली आहे. चेंदवण वेलवाडी जाणारी पायवाट बंद झाल्याने गावातील आठ घरांचा संपर्क तुटला असून तीन घरांना धोका कायम आहे. आठ घरांचा संपर्क तुटल्याने गणेशोत्सवाची तयारी कशी करावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. चेंदवण गावातील वेलवाडी येथील नेरकरघाटी डोंगरात अनेक झाडे भूस्खलन होऊन पडली असून डोंगर खचत असल्याने माती घरापर्यंत आली असून घरांना धोका निर्माण झाला आहे.