#MahaFloods परतीच्या पावसाचा सलग तिसऱ्या दिवशी तडाखा, सोलापूर, पंढरपूर, सांगली,साताऱ्यात मोठं नुकसान
Continues below advertisement
गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यावेळी ग्रामीण भागांसह शहरी भागातही पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. तर काही भागांत वीजपुरवठाही बंद आहे. काही भागांत साचलेलं पाणी घरांत जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Floods Solapur Flood Pandharpur Flood Rain In Maharashtra Pandharpur Heavy Rain Maharashtra Flood