31 डिसेंबरसाठी 20 तारखेला मार्गदर्शन सूचना जारी होणार, नववर्षाच्या पार्ट्या, नाईट क्लबवर बंधनं?
जर मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत तर राज्य शासनाला लेखी विनंती पत्र देऊन मुंबईत रात्र कर्फ्यू लावण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी सूचना केली आहे. मात्र, राज्य शासनाकडून रात्र कर्फ्यू लावण्याची कोणतीही तयारी नाही, तशी शासनाची इच्छाही नाही. नाईट क्लबला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत वर्तन सुधारले नाही तर नाईलाजानं कठोर पावलं उचलावी लागतील. ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर महापालिका नाईट क्लबमधील पार्ट्यांविरोघात कडक पावले उचलणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
Tags :
Guidelines For New Year Iqbal Chahal New Year Party Kishori Pednekar Bmc New Year Celebration