Sangali : द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल ABP Majha

Continues below advertisement

नाशिकप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांमध्ये अवकाळी पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. मागील २० दिवसांपासून सांगलीत ढगाळ वातावरण आहे. त्यातच अनेक रोगांचा प्रादुर्भाव आणि द्राक्षाच्या घडाची घडकूज होण्यास सुरुवात झालीए. त्यातच रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरलंय.  ऐन हिवाळ्यात मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळताहेत. मुंबईसारखाच कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावात पावसाच्या सरी बरसताहेत. अवकाळी पावसामुळे नाशकातील कांदा पिकासह द्राक्षबागांचं नुकसान झालंय. साताऱ्यातलं स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आलंय. पालघर जिल्ह्यात भातशेती पाण्यात गेली. रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय. त्यात आज आणि उद्याही हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे बळीराजा देवच पाण्यात ठेवून बसलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram