कलिना कॅम्पसच्या विकासकामांसाठी राज्यपालांचं पत्र, ठरावीक आस्थापनाकडूनच काम करून घेण्याचा उल्लेख
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद सभा 11 जानेवारी रोजी घेण्यात आली यामध्ये राज्यपालकडून विद्यापीठाला पत्र देण्यात आले असून त्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या विकास कामासाठी IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतीय कंपनीचा विचार केला जावा, असा त्यात उल्लेख आहे. मात्र वास्तविक पाहता मुंबई विद्यापीठाचे वास्तू विशारद, अभियंते असताना बाहेरील आस्थापनाची गरज का आहे? असा सवाल युवासेनेच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबकर यांनी विचारला असून या पत्रावरच त्यांनी आक्षेप घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Kalina Mumbai University Work Kalina Campus Bhagat Singh Koshyari MU Governor Mumbai University