Weather Report : गोंदियात तापमानाचा पारा घसरला, जिल्ह्यात सध्याचा तापमान 8.8 अंशावर
Weather Report : गोंदिया जिल्ह्याचा पारा वर जात असतानाच अचानक दोन दिवसापासून त्यात घसरण होत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्याचा तापमान 8.8 अंशावर असून एक दिवसाआधी गोंदिया जिल्हाचा तापमान 10.2 अंशावर होते. तर, आज पुन्हा तापमानात घसरण झाली व गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंडगार ठरला आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर अधिकचा वाढल्याने जिल्ह्यातील अनेकजन शेकोटीचा सहारा घेत असून उबदार कपड्याचाही उपयोग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.