Gondiaमध्ये 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल,श्वास गुदमरल्यानं विद्यार्थी बेशुध्द:ABP Majha
गोंदियातून एक संतापजनक घटना समोर आलीय.. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झालेत.. विद्यार्थ्यांचा श्वास कुणी कोंडला असा सवाल एबीपी माझानं विचारल्यानंतर सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय.. संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबीत करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी दिले आहेत.. तर गोंदियाचे नवनिर्वाचीत पालकमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.