Gondia : पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीये.. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. 45.18 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय.. दरम्यान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.