Gondia : Praful Patel आणि Devendra Fadnavis एकाच मंचावर, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी सुरू असताना गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल एकाच मंचावर दिसणार आहेत. प्रफुल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस उपस्थित राहणार आहेत... विशेष म्हणजे गोंदिया, भंडारा जिल्हा प्रफुल्ल पटेलांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचंही होम ग्राऊंड आहे... काँग्रेसमधील वादावादीमुळे आधीच नाना पटोले स्वपक्षीयांच्या टार्गेटवर असताना प्रफुल्ल पटेल यांच्या मंचावर देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola