Bappa Majha : Gondia : जांगळे कुटुंबीयांनी साकारला केदारनाथ मंदिराचा देखावा
Continues below advertisement
गणेश उत्सवादरम्यान नव-नवीन देखावे साकारून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गोंदियात एका गणेश भक्ताने घरघुती गणेश उत्सवा दरम्यान आपल्या घरी केदारनाथ मंदिराचा देखावा साकारून केदारनाथ यात्रेचे दर्शन घडविले आहे. यात्रेदरम्यान कुठली काळजी घ्यावी या सर्व बाबी देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या आहे. जांगळे कुटूंबीय १९६५ पासून गणेश उत्सव साजरा करीत असून दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान नव-नवीन देखावे तयार करून भाविकांचे लक्ष आकर्षित करत असतात. तयार केलेल्या देखाव्याचे फोटो, व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करीत असल्याने भाविक देखील त्यांच्याकडे देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी..
Continues below advertisement