Gondia Online Fraud : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपूरमधील एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटींची फसवणूक

Continues below advertisement

गोंदियातील एका सटोडियाने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपूरमधील एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटींची फसवणूक केलीय. नोव्हेंबर २०२१ पासून ही फसवणूक सुरु होती. याप्रकरणी अनंत जैन हा गोंदियातील आरोपी फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केलीय. ताज्या  अपडेटनुसार जैनच्या घरातून जवळपास १६ कोटी रोख, १२ किलो सोनं आणि २०० किलोंची चांदी जप्त करण्यात आलीय. गोंदिया शहराच्या सिव्हील लाईन भागातील काका चौकात जैन यांचं घर आहे. आरोपी अनंत जैन क्रिकेट सटोडा असून फिर्यादी हा व्यवसायाच्या निमित्त त्याच्या संपर्कात आला होता. नागपूरच्या इतिहासातील ही ऑनलाईन फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram