Congress Party President | राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी द्या, काँग्रेस नेत्यांची मागणी
Continues below advertisement
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल केले जातील असं सतत बोललं जातं. परंतु गेली काही वर्षं कॉंग्रेस मधील बदलांची फक्त चर्चा होत आली आहे. आज देखील सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांची दिल्लीत जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय न होता पुन्हा एकदा शिमला किंवा पंचमढी या ठिकाणी चिंतन शिबिर घ्यायचं ठरवलं गेलंय. निर्णय रेंगाळत ठेवण्यामुळे कॉंग्रेसमध्य वरपासून खालपर्यंत वर्षषानुवर्ष तीच तीच लोकं पदांवर असल्याच दिसुन येतंय. पक्ष देईल ती जबाबदाकी स्वीकारयला तयार आहे, असे राहुल गांधी या वेळी म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्त्व्यानंतर बैठकीत टाळ्याचा कडकडाट झाला.
Continues below advertisement