लोक कलाकारांची व्यथा मांडणारा गणरायाचा देखावा,टाळेबंदीच्या काळात लोक कलाकारांचे हाल देखाव्यातून सादर
Continues below advertisement
टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसोबतच लोककलाकारांचे मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. केवळ कलेवर अवलंबून असणाऱ्या या कलाकारांची मोठया प्रमाणात उपासमार झाली होती. हीच बाब लक्षात घेतं लोअर परेल परिसरातील राजेश पाटील यांनी यंदा देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम राखत लोककलाकारांची व्यथा मांडणारा सेट तयार केला आहे. याबाबत बोलताना राजेश पाटील म्हणाले की टाळेबंदीत या कलाकारांची मोठया प्रमाणात परवड झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांची ही व्यथा सरकारपर्यंत जाण्यासाठी आम्ही हा सेट तयार केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Ganpati Decoration Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Folk Art Parel Bappa Majha Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020