
Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठाकडून विविध शुल्कावर जीएसटी लागू , शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर
Continues below advertisement
गडचिरोलीसारख्या मागास आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे.. यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, स्थापनेपासून शिक्षणाव्यातिरिक्त इतर कारणांसाठीच हे विद्यापीठ चर्चेत असते. विद्यापीठातील असाच एक निर्णय पुन्हा चर्चेत आला आहे... गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना १८ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचं परिपत्रक काढलंय... या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजीचे सूर उमटत आहेत. शिक्षण क्षेत्राचा जीएसटीत समावेश करणार नसल्याचं केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट करुनही विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे...
Continues below advertisement