Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो

Continues below advertisement

सध्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधत असल्याची माहिती फडणवीसांनी नागपुरात बोलताना दिली.  दरम्यान नक्षलवादाचा बिमोड हा गडचिरोलीचं पालकमंत्री बनण्यामागचा मुख्य हेतू नसून, तिथल्या खाण उद्योगाचा मलिदा खाण्यासाठी ही धडपड सुरू असते, असा आरोप काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी केला होता. 

एक काळ असा होता की गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला कोणी तयार नसायचं, पण माजी गृहमंत्री आर आर आबांनी ही प्रथा मोडली आणि गडचिरोलीच्या विकासात मन लावून काम करुन दाखवलं. नंतर मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे पद चर्चेत आणलं. तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनीही पालकमंत्री म्हणून मेहनत घेतली. मात्र या सगळ्यावर खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram