Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी

Continues below advertisement

गडचिरोली : लालपरीसोबत तीन पिढ्यांच्या आठवणी कायम आहेत, त्यामुळे रस्त्यावर धावणारी महामंडळाची बस (Bus) दिसली की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्या बसने मामाचा गाव दाखवला, ज्या लालपरीने कॉलेजला पोहोचवलं, ज्या एसटीने प्रवास सहज-सोपा केला ती एसटी बस आजही कित्येक गावापासून कोसो दूर आहे. त्यामुळे, एखाद्या गावात बस आल्यानंतर तिची उत्सुकता आणि आनंद हा संस्मरणीय ठरतो. आज स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील (Gadchiroli) गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. त्यामुळे, माओवाद्यांच्या बालेकिल्लातच मुख्यमंत्र्यांनी खास एसटी प्रवास करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. या बससेवेनंतर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले असून आनंदही व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram