BHIWANDI : तीन मुलांनंतर चौथी मुलगी नकोशी ! ABP MAJHA
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत डॉक्टरला मूल विकल्याची घटना ताजी असतानाच भिवंडीत नवजात मुलीच्या विक्रीचा डाव ठाणे पोलिसांनी उधळलाय. भिवंडीत राहणारे वकील अन्सारी यांची पत्नी मुमताज अन्सारी हिने चार डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आधीच तीन मुले असल्याने चौथी मुलगी नको म्हणून या दोघांनी आपली मुलगी दीड ते दोन लाख रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मुमताजची बहीण, भाऊ आणि दलालांची मदत घेतली. ठाणे पोलिसांना याची माहिती मिळताच बनावट खरेदीदार बनवून या बालिकेच्या खरेदीसाठी संपर्क केला. त्यानंतर ठाण्यातील हॉटेलमध्ये बोलावत सापळा रचून मुलीच्या आई-वडिलांसह सहा जणांना बेड्या ठोकल्यात.
Tags :
Maharashtra Father Brother भाऊ महाराष्ट्र Mother आई Sister बहीण महाराष्ट्र बहीण 4th Daughter Bhinwadi Sale Of Daughter