Uttar Pradesh : दारात पडलेलं चॉकलेट खाल्ल्यानं चौघांचा मृत्यू, चॉकलेटसोबत आढळले पैसे : ABP Majha
बातमी जरी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमधली असली तरी सर्व पालकांना सावध करणारी आहे.. दारात पडलेलं चॉकलेट खाल्ल्यानं चार लहानग्यांचा मृत्यू झलाय.. ज्यात दोन मुलांचा आणि दोन मुलींचा समावेश आहे.. घरातले मोठे कामात व्यस्त असताना मुलं बाहेर पडली. दारात पडलेलं चॉकलेट पाहून त्यांना मोह आवरला नाही.. मात्र चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलांना विषबाधा झाली... पालकांनी मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.. दरम्यान चॉकलेटसोबत पैसे देखील आढळून आलेत. त्यामुळं हा जादूटोण्याचा प्रकार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जातेय.