Ganesh Visarjan 2020 | डंपरमध्ये गणेश विसर्जनाला माजी मंत्र्यांचा आक्षेप, विधिवत विसर्जन होत नसल्याची खंत

शिवसेनेच्या माजी आरोग्य मंत्र्यांनी डंपरमध्ये गणेश विसर्जनाला आक्षेप घेतला आहे. शिवसेना नेते दीपक सावंत यांनी मुंबई महापालिकेच्या गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या नियमावलीनुसार प्रत्येक वॉर्डमध्ये गणपती विसर्जनासाठी डंपर उभारण्यात आले आहेत. मात्र कचरा गोळा करणाऱ्या डंपरमध्ये विसर्जन केल्याने धार्मिक भावना आणि आस्था दुखवल्या जात असल्याचं दीपक सावंत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करून यापुढे कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी त्यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola