SSR Case Update | सीबीआयचं पथक आज पुन्हा सुशांतच्या घरी, सिद्धार्थ, नीरज आणि सुशांतच्या ट्रेनरची चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर आणि बराच काळ सुशांतसोबत असलेला नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता.

नीरजने सांगितले की, कॅप्री हाइट्समध्ये राहत असताना सर जेव्हा वर्कआऊट करायला बाहेर जायचे. तेव्हा मी त्यांची रूम साफ करायचो आणि जेव्हा मुंबईबाहेर जायचे तेव्हा त्यांच्या बेडरूमची चावी घेऊन जायचे. मात्र जेव्हा माउंट ब्लॅक मध्ये ते शिफ्ट झाले तेव्हा सुशांत सर रूममध्ये कपडे बदलत असतील किंवा जर रूममध्ये रिया मॅम असतील तेव्हाच रूम आतून लॉक असायची. परंतु ती रूम बाहेरून लॉक करून सर कधीच गेले नाहीत, असं नीरजनं सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola