ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ, पदाचा गैरवापर केल्याचा PMLA कोर्टाचा ठपका

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्यासह आता व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कारण व्हिडिओकॉनला दिलेल्या बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं दिसतंय असा ठपका गुरूवारी पीएमएलए कोर्टानं ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी 12 फेब्रुवारी होणाऱ्या सुनावणीत चंदा कोचर यांच्यासह वेणुगोपाल धूत यांनाही हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर हे ईडीनं दाखल केलेल्या केसमध्ये झालेल्या अटकेनंतर जेलमध्ये आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola