Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | ABP Majha

  1. मराठा आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

 

  1. विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा होणार, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष

 

  1. इंधनदरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन, तर वीजबिलामाफीच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, राज्यातल्या महावितरण कार्यालयात टाळेबंदी आंदोलन करणार

 

  1. जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

 

  1. 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला

 

  1. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन लवकरच धावण्याची शक्यता, मार्गाचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती, मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनही प्रस्तावित

 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, विकासकामांचा आढावा घेणार, नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसेकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा

 

  1. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ, पदाचा गैरवापर केल्याचा पीएमएलए कोर्टाचा ठपका, कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना हजर राहण्याचे आदेश

 

  1. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई, अनेक ठिकाणी धाडी, काँग्रेस नेते आशिष देशमुखांच्या आरोपांनंतर कारवाईला वेग

 

 

  1. ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक मालिकाविजयानंतर टीम इंडिया इंग्लंडशी दोन हात करण्यास सज्ज, आजपासून चेन्नईत पहिली कसोटी मालिका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola