Indian star tortoise | वनविभागाकडून मुंबई, ठाण्यात 70 कासव जप्त, पहिल्या टप्प्यात 21 कासवांना जंगलात सोडणार

मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून जप्त केले 70 स्टार कासव चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गमुक्त करण्यात येणार आहेत. राज्याच्या वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून हे 70 स्टार कासव चंद्रपूर च्या transit treatment centre ला ठेवण्यात आले आहे. दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे हे कासव लोकं आवडीने घरात पाळतात म्हणून यांची भारतातील गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक राज्यातून देश-विदेशात तस्करी केल्या जाते. यांचा आकार पाहून दोन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत यांची विक्री होते. गेल्या काही महिण्यात वनविभागाने ठाणे आणि मुंबई भागात कारवाई करून हे कासव जप्त केले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola