Jalgaon Birds | जळगावात विदेशी पाहुण्यांचं आगमन, विविध जलाशयांवर पक्ष्यांचं दर्शन!
Continues below advertisement
रशिया, सायबेरीयासह अनेक युरोपीय देशातील हजारो पक्ष्यांचे जळगाव जिल्ह्यात आगमन झाले आहे. हे विदेशी रंगीबेरंगी पक्षी पाहण्यासाठी पक्षी निरिक्षक गर्दी करत आहेत. दरवर्षी थंडीचा जोर वाढताच विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यातील विविध जलाशयांवर आगमन होतं. या पक्ष्यांना हिवाळी पक्षी म्हणूनही जिल्ह्यात ओळखलं जातं. यंदाही नदी सुराय, कमल पक्षी,स्वराल, जांभळी पणकोंबंडी,तुतारी, पांढरा धोबी, पान दुबी, थपट्या, श्वेत कंठी, धान वाटवट्या इत्यादी प्रकारचे विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच जलाशयांवर सध्या शिक्रा,मालमुनिया, वेडा राघू, पान कावळे, पान बदके, खंड्या धिवर, वंचक या स्थानिक प्रजातीच्या पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी ही खास मेजवानी ठरली आहे.
Continues below advertisement