देशात प्रथमच DNA चाचणीच्या मदतीनं बलात्कार पीडेतेला न्याय, बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी
Continues below advertisement
13 वर्षापूर्वी बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी देण्याचे आदेश भंडारा जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आहेत.. संबंधित मलीला जन्मापासून लग्नापर्यंत 5 हजारांची पोटगी देण्याचे आदेश आहेत. आणि त्यासाठी आरोपीच्या अचल संपत्तीवर न्यायालयानं 8 लाख रुपयांचा बोजा चढवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झालेला असल्यानं न्यायालयानं आरोपीच्या कुटुंबीयांना ही पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. आणि ही पोटगी न दिल्यास आरोपीच्या संपत्तीचा लिलाव करून पोटगीची रक्कम वसूल करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.
Continues below advertisement