अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो घोषणेचा समाचार

नवी दिल्ली: या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. त्या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या. देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे असेही त्या म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "कोरोनाचे एवढं मोठं संकटही सरकारला आपल्या सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यासाठी आळा घालू शकलं नाही. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वाची भूमिका बजावेल."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola