पहिलं स्वदेशी विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव 'माझा'वर, विमान निर्मितीत मराठमोळ्या तरुणाची कमाल!
भारतीय बनावटीचा पहिलं विमान निर्मिती करणारे कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने हे विमान तयार करून आकाशात उड्डाण घेण्याचा स्वप्न साकार झाला आहे. कारण मागील आठवड्यात या विमानाची टेक ऑफ लँडिंग चाचणी यशस्वीपणे पार पडली. आता सर्किट टेस्टिंगमध्ये एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर या विमानाच्या चाचणी झाल्यानंतर हे विमान आता सेवेत रुजू होण्यास सज्ज आहे.