Azad Maidan Protest | अशोक चव्हाणांना उपसमितीतून हटवा आझाद मैदानाबाहेर मेटेंचं जागरण गोंधळ आंदोलन
राज्याच्या विविध भागात मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या आझाद मैदान येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवा, मराठा आरक्षण टिकवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारल्याने रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आलं.