#Corona मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात देशातलं पहिलं 'विषाणू रक्षक प्रेशराईज चेंबर'
आज मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णलयात आपलं विषाणूपासून रक्षण व्हावं यासाठी देशातील पहिल्या 'विषाणू रक्षक प्रेशराईज चेंबर'चं उदघाटन करण्यात आलं.वैद्यकीय शिक्षण संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबर्सचं उदघाटन करण्यात आलं.
कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून विषाणू संसर्ग हा आरोग्य कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना होऊ नये, यासाठी या आयसोलेटेड चेंबर्सची निर्मिती जे.जे. रुग्णलयाच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या डॉक्टरांच्या टीमने केली आहे.