Corona Mask | पुणे,पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1हजाराचा दंड आकारण्याचा विचार- अजित पवार
Continues below advertisement
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवावी लागेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement