TRP Scam| पार्थो दासगुप्ता-अर्णब गोस्वामींमध्ये आर्थिक व्यवहार?पार्थ दासगुप्तांच्या पोलीस कोठडीत वाढ
टीआरपी घोटाळ्यात बार्क या संस्थेचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनाच अटक झाली आणि आज त्यांची कोठडीही वाढवली. पण तीच कोठडी वाढवताना पोलिसांनी दिलेल्या अहवालात अर्णब गोस्वामी यांचं नाव घेण्यात आलंय. पण या अहवालात लावण्यात आलेले आरोप मात्र धक्कादायक आहेत.