Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय कायद्यानुसार होणार, राज्यपालांचं मुख्यमंत्र्याना पत्र
Continues below advertisement
मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय राजपाल घेणार आहेत. कायद्यानुसार निर्णय होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय अधांतरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे.
Continues below advertisement