येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
Continues below advertisement
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु,असं मुख्यमंत्री म्हणाले होते. अखेर आज यासंदर्भात निर्णय झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Pomegranate Farmer Pomegranate Farming Pomegranate Farms Pomegranate Lockdown Damage Farmer Loss Farmer Help Vijay Vadettiwar Maharashtra Farmer Lockdown In Maharashtra Lockdown Effect