Buldhana Shiv Sena Melawa : चिखलीत उद्या ठाकरे गटाचा शेतकरी मेळावा, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
बुलढाण्यातील चिखलीत उद्या ठाकरे गटाचा शेतकरी मेळावा होतोय. या मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येतायत. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.. बुलढाणा हा विदर्भातील शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून ओळखला जातोय.. मात्र याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.. उद्या होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय