वाशिममधील संत्रा उत्पादक संकटात, बुरशीजन्य रोगामुळे शेतकरी त्रस्त, संत्रा बागेवर रोगाचा प्रादुर्भाव
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय संत्रा फळ बागेवर बुरशीजन्य आजारामुळे जिल्ह्यातील संत्रा बाग धोक्यात सापडली आहे. जिल्ह्यात संत्रा बगीच्यांमध्ये झाडांना हस्त बहाराची नवीन नवती फुटलेली आहे. या नवीन नवती व मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणाऱ्या काळीमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. काळ्या माश्यांचे प्रौढ व पिल्ले कोवळ्या पानातील अन्न रसाचे शोषण करतात व शरीरातून मधा सारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात. त्यावर काळ्या बुरशीची पानावरती झपाट्याने वाढ होते.किडीद्वारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फलधारणा कमी होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आता शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करण्यात वेस्त दिसत आहे.
Continues below advertisement