Farmers Protest | भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचं आंदोलन, हेक्टरी 37 क्विंटलपर्यंत खरेदीची मागणी

भिवंडीतील दुगाड फाटा केंद्रावर भात उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.  या आंदोलना दरम्यान भात खरेदीतील ऑनलाईन पद्धत बंद करून हेक्‍टरी ३७ क्विंटलपर्यंत भात खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. यावेळी भात विक्रीसाठी   शासनाने लागू केलेली ऑनलाइन पद्धत देखील रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola