राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा, तोवर आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत- संभाजीराजे छत्रपती
रविवारी राज्यभरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात अजूनही येतं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे. आणि या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे.
Tags :
Mpsc Exam Schedule MPSC Exam Maratha Aarakshan Mpsc New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Maratha Reservation LIVE SEBC Act Supreme Court Maratha Reservation