प्रकाश आंबेडकर, धमक असेल तर समोर या,राजांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ उदयनराजेंच्या समर्थकांचा संताप
मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. 'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.