EXCLUSIVE Uday Samant | विद्यापीठ परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत निर्णय देणार- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर माजी कुलगुरुंसोबतही संवाद साधला जाणार आहे.
Tags :
Uday Samant Exam Open Book Test Maharashtra Exmas University Exams Uday Samant Central Government Mumbai University State Government