Bandra Crowd Issue | 24 तासांसाठी ट्रेन का सुरू केली नाही? वांद्रे गर्दी प्रकरणानंतर मंत्री आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola