Maharashtra Exams | विद्यापीठ-महाविद्यालयीन परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाबाबत यूजीसीकडे समित्यांच्या शिफारशी
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) नेमलेल्या 2 समितींच्या शिफारसीनुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. तर दुसऱ्या परीक्षेसंदर्भात नेमलेल्या समितीने या महाविद्यालय, विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी विद्यापीठाने करावी किंवा ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्यास लॉकडाऊन मागे घेण्याची प्रतीक्षा करून त्यानुसार पेन पेपरद्वारे नेहमीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याची तयारी करावी व त्यानुसार परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात.
Continues below advertisement