लातूर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती, काहीच तासात 130 ते 140 मिलिमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात औसा रेनापुर उदगीर निलंगा या तालुक्यातील अनेक भागांमध्ये अक्षरशा ढगफुटी झाली होती. शंभर मिलिमीटर ते 130 ते 140 मिलिमीटर पर्यंत पावसाची अवघ्या काही तासांमध्ये नोंद झाली आहे. या पावसाने शेतीचे सर्व अर्थकारण बदलून गेला आहे कमी वेळामध्ये अधिक झालेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाला आहे सोयाबीन ज्वारी यांसारखी पिके ही पाण्यात नष्ट झाली आहेत तर ऊस आडवा झाला आहे बऱ्याच ठिकाणी शेतजमीन अक्षरशः वाहून गेली आहे आणि त्याखालचे दगड-धोंडे हे वर आल्या आहेत रेणापूर तालुक्यातील मोठेगाव औसा तालुक्यातील भादा उदगीर तालुक्यातील मोघा निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या भागांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे कर्नाटक महाराष्ट्र च्या सीमावर्ती भागात मांजरा नदी कर्नाटकात जाण्यापुर्वी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीपात्रात आपला प्रवाह बदलत या भागातील मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान करत गेली आहे याच भागामध्ये काही वर्षांपूर्वी पाऊस नव्हता.