पेट्रोल 92₹ लिटर हे दर भाजपला कमी वाटतात?केंद्राने दर कमी करावे मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी

मुंबई : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola