Aurangabad | नामांतरावरून मनसेकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा, चंद्रकांत खैरेंवर फेकली पत्रकं

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आज मनसेना शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली.खैरे यांच्या अंगावर पत्रकही देखील भिरकावली. खरतर उद्या मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं यासाठी चा वाद सुरू आहे. मनसेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारी चा अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यानंतर मनसेकडून आता खैरे यांची गाडी अडवण्याचा आंदोलन करण्यात आले. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचे म्हटले तर मनसेने देखील शिवसेनें हे करून दाखवण्याचे आव्हान दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola