DIGIPIN News : पोस्टखात्याचा मोठा निर्णय, पिनकोडऐवजी डिजिपिन वापरणार

Continues below advertisement

DIGIPIN News : पोस्टखात्याचा मोठा निर्णय, पिनकोडऐवजी डिजिपिन वापरणार

DigiPIN : पोस्टल पत्त्यांमधील आकर्षण ठरलेला पिन कोडचा काळ आता संपत आला आहे याला पर्याय म्हणून भारतीय पोस्ट विभागाने ‘डिजीपिन’ (DigiPIN) नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. डिजीपिन ही आता देशातील नवी पत्ता प्रणाली (Address System) ठरणार आहे. पारंपरिक पिन कोड पूर्ण क्षेत्राचा समावेश करतात, तर 10 अंकी डिजीपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात पिन कोड आणि डिजीपिनमधील फरक...

भारतीय पोस्ट विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी डिजीपिन (DigiPIN) प्रणाली सादर केली आहे. डिजीपिन हा 10 अंकी डिजिटल कोड आहे. पारंपरिक पिन कोड ज्या प्रकारे विस्तृत क्षेत्राचा समावेश करत होता, त्याऐवजी डिजीपिनमुळे अचूक स्थानाची माहिती मिळणार आहे. म्हणजेच, तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान डिजीपिनद्वारे शोधता येईल. 

आपत्कालीन सेवांना अचूक ठिकाणी पोहोचण्यास होणार मदत

डिजीपिन तयार करण्यासाठी आणि कोड मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचा डिजीपिन मिळवू शकतात. डिजीपिनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तो पत्रव्यवहार योग्य पत्त्यावर पोहोचवण्यात मदत करेल आणि रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना अचूक ठिकाणी पोहोचण्यात मदत करेल. ग्रामीण भागांसह दुर्गम भागात डिजीपिन फायदेशीर ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. डिजीपिन केवळ पत्रव्यवहारासाठीच नव्हे, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील पार्सलसुद्धा अचूक ठिकाणी पोहोचवण्यात सक्षम ठरेल, असं सांगितलं जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola