Dhule Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे इफेक्ट! कर्मचाऱ्यांच्या वेळेत हजेरी लावण्यासाठी रांगा
Dhule Tukaram Mundhe : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची ज्या विभागात नियुक्ती होते तिथं ते आपल्या कामाची छाप पाडतात. त्यांचा दरारा असा आहे की ते रुजू झाले की त्या खात्यातील कर्मचारीही सतर्क होतात. मुंढे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाचे संचालक म्हणून सूत्रं घेतल्यानंतर याचाच प्रत्यय येऊ लागलाय. एरवी कार्यालयातल्या हजेरीला महत्त्व न देणारे कर्मचारी आता वेळेत हजेरी लावण्यासाठी रांगा लावू लागलेत. याशिवाय रुग्णवाहिकांच्या देखभालीकडेही विशेष लक्ष दिलं जातंय.